के व्ही एन नाईक महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम

के व्ही एन नाईक महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम

सिन्नर, दि. ११ सप्टेंबर २०२६ : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर  येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी  बार्टी विभागाच्या सविता उबाळे यांनी महाविद्यालयाला भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला व महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य  किशोर पखाले तसेच  वैशाली सानप ,पुनम कुटे,  स्वाती चोथवे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रशांत हाडपे , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.