वाणिज्य विभागाच्या अंतर्गत गोंदेश्वर सिन्नर येथे वनभोजनातून विद्यार्थिना निसर्गसंवर्धनाचा संदेश
सिन्नर, दि. ८ सप्टेंबर : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नरच्या वाणिज्य विभागाच्या वतीने सिन्नर येथील गोंदेश्वर परिसरात वनभोजनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात वाणिज्य विभागातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वनभोजनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी वेळ घालविण्यासोबतच सामूहिक सहभाग, शिस्त, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा अनुभव मिळाला. गोंदेश्वर येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थिनींनी परिसराची पाहणी केली. तसेच ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या गोंदेश्वरी मंदिराचे दर्शन घेऊन मंदिराची प्राचीन वास्तुरचना, ऐतिहासिक वारसा व सांस्कृतिक महत्त्व यांची माहिती जाणून घेतली.
वनभोजनादरम्यान विविध सामूहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत परिसरात स्वच्छता राखली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले, वाणिज्य विभागप्रमुख स. प्रा. सुजाता दिघे, स. प्रा. ऋषिकेश आव्हाड व स. प्रा. उमेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

digitalnashik_admin




