बिटको महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बिटको महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नाशिक रोड: महिलांसाठी आरोग्य व मानसिक शारीरिक व स्वतःच्या महिला हक्क याबद्दल पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिता साबळे राष्ट्रीय ज्यूदो व कुस्ती खेळाडू यांचं व्याख्यान व प्रात्यक्षिक  ठेवण्यात आले. साबळे यांनी छान पैकी महिला हक्क या विषयावर बोलताना महिलांच्या हक्का विषयी न्याय प्रणाली मध्ये असणारे कलम विद्यार्थ्यांना व शिक्षकांना समजावून सांगून त्यांचे प्रबोधन केले.सेल्फ डिफेन्स कसा केला पाहिजे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक योगेश शिंदे यांनी महिलांना योगासने व सूर्यनमस्कार याचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांना रोज एक तास व्यायाम करण्यास सांगितले. व सर्व महिला विद्यार्थी व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ कृष्णा शहाणे तसेच उप प्राचार्य प्रणाली पाथरे पर्यवेक्षिका व राधा पाटील क्रीडा शिक्षक योगेश शिंदे धनंजय बर्वे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश शिंदे यांनी केले तर अध्यक्ष मार्गदर्शन उप प्राचार्य प्रणाली पाथरे मॅडम यांनी केले तसेच आभार  पर्यवेक्षिका राधा पाटील मॅडम यांनी केले व्याख्यान दिले .