युवक राष्ट्रवादी कडून मंत्री छगनरावजी भुजबळांचा वाढदिवस उत्साहात साजरा

युवक राष्ट्रवादी कडून मंत्री छगनरावजी भुजबळांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नाशिक (दि. १५ ऑक्टोंबर २०२५) - राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगनरावजी भुजबळ यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, पंकज भुजबळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने ६५ फूट पुष्पहार व शाल,फेटा घालत ढोल ताशांच्या गजराने जंगी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेले पुस्तके मंत्री छगनरावजी भुजबळ यांना भेट म्हणून देण्यात आले.

          मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी आवाहन केल्याप्रमाणे युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुस्तके घेऊन भुजबळांना भेट म्हणून दिले. भुजबळ यांचा वाढदिवस भुजबळ फार्म येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. नाशिकच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवणारे मंत्री छगनरावजी भुजबळांची नाशिकच्या जनतेत विकासपुरुष अशी छबी असून नाशिक शहरासोबत जिल्ह्यातील इतरही विविध विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी चालना दिली आहे. नाशिक फेस्टिव्हलच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे हे भुजबळ कुटुंबियांचे निकटवर्तीय असून मंत्री छगनरावजी भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जंगी तयारी करून ढोल ताशांच्या गजरात त्यांचा वाढदिवस साजरा केला.

यावेळी अमोल नाईक, मुकेश शेवाळे, दिपक पाटील, संदिप गांगुर्डे, डॉ. संदिप चव्हाण, व्यंकटेश जाधव, हर्षल चव्हाण, बादल कर्डक, संतोष भुजबळ, रियान शेख, कुलदीप जेजुरकर, निलेश जाधव, महेश बाळसराफ, भूषण गायकवाड, संदिप खैरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.