१३०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया निविदेचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा

१३०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया निविदेचा  वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा

नाशिक : नाशिक महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी निविदा प्रक्रियेची तपासणी करून सुस्पष्ट अभिप्रायांसह वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मनपा आयुक्तांना दिले आहेत. १३०० कोटी रुपयांच्या या निविदा प्रक्रियेबाबत शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तक्रारीची दखल घेऊन निविदा प्रक्रियेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश बुधवार दि. ०९ एप्रिल रोजी मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. 

१३०० कोटी रुपयांच्या या निविदा प्रक्रियेबाबत शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी हरकत नोंदवून प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला होता. विशिष्ट ठेकेदारासाठी मनपा अधिकाऱ्यांनी सर्वांना समान संधी न देता १३०० कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केल्याचा आरोपही प्रविण (बंटी) तिदमे यांनी केला होता. नाशिककरांच्या पैश्यांची उधळपट्टी रोखून पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी. निविदा प्रक्रियेपूर्वी राज्य आणि केंद्र शासनाच्या, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या परवानग्या घेतल्या का ? परवानगी न घेता निविदा प्रक्रिया राबविल्यास केंद्राकडून निधीच न मिळण्याचा धोका प्रविण तिदमे यांनी व्यक्त केला आहे.  उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तक्रारीची दखल घेऊन निविदा प्रक्रियेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानुसार वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश बुधवार दि. ०९ एप्रिल रोजी मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत.