सिन्नर शहरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात ‘शिवजयंती सोहळा’ संपन्न!

सिन्नर शहरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात ‘शिवजयंती सोहळा’ संपन्न!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दुर्गवंदन आणि क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालय,सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती निमित्त दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सिन्नर शहरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात हा सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालय,सिन्नर व शहरातील प्रमुख मार्गांवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत  काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘जय भवानी, जय शिवाजी ’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात शिवचरित्रावरील भाषणे, पारंपरिक लेझीम पथक व टाळ,दंड तसेच आगीतून उडी मारणे याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

 अभाविप चे नाशिक विभाग संघटन मंत्री डॉ गोविंद जी देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आणि त्यांच्या आदर्शांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रम अध्यक्ष के व्ही एन नाईक संस्थाचालक समाधान जी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आणि त्यांच्या आदर्शांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. तसेच मातोश्री निर्मला गोपाल कुलकर्णी विद्यालय,सिन्नर व चांडक कन्या विद्यालय, सिन्नर व आय टी आय कॉलेजया, सिन्नर व कला वाणिज्य महाविद्यालय,सिन्नर या शाळांनी व महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. 

कार्यक्रमाला अभाविप नाशिक विभाग संघटनमंत्री डॉ गोविंद देशपांडे,के व्ही एन नाईक संस्थेचे विश्वस्त नामदेवरावजी काकड ,के व्ही एन नाईक संस्थाचालक समाधान जी गायकवाड, अभाविप सिन्नर शहराध्यक्ष प्रा शिवराज सोनवणे सर, शहर उपाध्यक्ष प्रा महेश शिंदे सर व प्रा अमोल आव्हाड सर, प्रदेश कार्यकारणी सदस्य स्नेहा पाबळे,  महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व अभाविप चे कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे शिवजन्मोत्सवाचा पालखी सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होते, असे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.