सोशल मीडियाच्या युगात ‘रिल्स’च्या प्रभावामुळे कलेची अभिरुची ढोबळ व झटपट प्रसिध्दीची हाव -- प्रितम नाकील

सोशल मीडियाच्या युगात ‘रिल्स’च्या प्रभावामुळे कलेची अभिरुची ढोबळ व झटपट प्रसिध्दीची हाव   -- प्रितम नाकील

नाशिक (प्रतिनिधी) – आजच्या सोशल मीडियाच्या युगात ‘रिल्स’च्या प्रभावामुळे कलेची अभिरुची ढोबळ होत चालली आहे. कमी वेळात मिळणारी प्रसिद्धी यालाच यश मानले जात असल्याची खंत व्यक्त करत, “अशा काळात ‘सूर विश्वास कुमारमंच’सारखे उपक्रम नव्या पिढीतील कलाकारांना सकस, अभिजात शास्त्रीय संगीताची दिशा देणारे ठरतील,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायक प्रितम नाकिल यांनी केले.

सूर विश्वास कुमारमंच’च्या कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित तेरावे पुष्प विश्वास को-ऑप. बँकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, सावरकरनगर येथे उत्साहात पार पडले. या वेळी श्री नाकिल यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, साधना आणि सातत्य यावर भर देण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमात अनन्या गायधनी, सुषुम्ना कापडणीस, तनिष बोरसे, गीत पटेल आणि आर्यन शिलावत यांनी राग मालकंस सादर करत शास्त्रीय गायन सादर केले. रोनित शिंदे याने सोलो तबला वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

विजडम हाय इंटरनॅशनल स्कूल, सिरिन मेडोज कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी समुहशास्त्रीय गायन सादर केले. यामध्ये युगा चौधरी, आरोही सामनेरकर, अद्विक कर्वे, रूद्र पाठक, शौर्य रिपोटे, शार्वी हिरे, कबीर केळकर, पुर्वा निकम, अनय सोनवणे, आरना भावसार, श्रीहान देवरे, सहर्ष तेजाळे, अद्विक नावलेकर, दिवीत नावलेकर यांनी सहभाग घेतला. तबलासाथ अवनिश वानखेडे यांनी केली.

चित्रकला प्रात्यक्षिक अनन्या सामनेरकर आणि आदित्य काठोळे यांनी सादर केले. संपूर्ण मैफल सिद्धार्थ निकम, सौरभ क्षीरसागर आणि भाग्यश्री कनसारा या गुरूंच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली. सूत्रसंचालन विनया देशपांडे यांनी केले.

सूर विश्वास कुमारमंच’ ही शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ आहे. अधिकाधिक रसिकांनी यात सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर व संकल्पक विनायक आशा पुरूषोत्तम रानडे यांनी केले.

या उपक्रमाला विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (शाखा जलालपूर), विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, आणि ग्रंथ तुमच्या दारी या संस्थांचे सहकार्य लाभले.