के. व्ही. एन. नाईक सिन्नर महाविद्यालयात Intellectual Property Rights या विषयावरती कार्यशाळा संपन्न
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे वाणिज्य विभागाअंतर्गत Awareness about Intellectual property rights (lPR)and patents Filling या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पखाले यांनी भूषवले . या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आलेले जी एम डी सिन्नर महाविद्यालयाचे केमिस्ट्री विषयाचे प्रोफेसर डॉ.मनोज गवारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आयडियाज आपण कशाप्रकारे पेटंट म्हणून फाईल करू शकतो हे समजावून सांगितले, तसेच पेटंट फाईल करण्यासाठी जी प्रोसेस असते ती ऑनलाइन पद्धतीने समजावून सांगितली यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख सुजाता दिघे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय क्यू एस सी कॉर्डिनेटर कल्पना घुगे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन ऋषिकेश आव्हाड यांनी केले.

digitalnashik_admin




