रासोयो अवयवदान बातमी

रासोयो अवयवदान बातमी
अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान     
लोणवाडी येथील श्रमसंस्कार शिबीर व्याख्यानमालेत 
डॉ.संजय रकिबे यांचे प्रतिपादन                   
पिंपळगाव बसवंत २६.१.२०२४
प्रत्येक व्यक्तीने मृत्यूनंतर आपले अवयव दान केले तर कितीतरी व्यक्तींचे जीवनात पुन्हा एकदा आनंद येऊ शकतो. समाजात जन्मताच एखाद्या व्यक्तीला विकलांग असतो वा अपवादाने अवयव निष्क्रिय होतात किंवा अपघातामध्ये जातात त्यांना किडनी, डोळे, त्वचा, हृदय, मज्जारुजू यासारख्या अवयवांची गरज पडू शकते. एखाद्या गरजवंतांच्या आयुष्यात डोळे, त्वचा, हृदय, किडनी यासारख्या अवयवांची गरज असेल आणि त्याला ते मिळाले तर त्याच्या जीवनात प्रकाश येऊ शकतो ते फक्त अवयव दान केले तर आजच्या काळात अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन डॉ.संजय रकिबे यांनी केले. लोणवाडी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दुपार सत्रातील अवयवदान या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आहेरगावचे सरपंच डॉ. उद्धव रसाळ, दावचवाडीचे डॉ.नवीन कोचर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार, डॉ. दत्तात्रय फलके, प्रा. अजय देशमुख, श्रीमती निरगुडे तेजल, श्रीमती रायते एस.एन., श्रीमती साबळे आदी उपस्थित होते.
डॉ.संजय रकिबे पुढे म्हणाले, मृत्यूनंतर अवयव दानाचा अधिकार जसा पाश्यात देशात राष्ट्राच्या अधिकारात आहे तसे भारतात अवयव दान करण्याचा अधिकार त्या त्या व्यक्तीच्या हातात आहे अशी माहिती दिली. यावेळी अवयव दान याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असणारे गैरसमज प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सोडविण्यात आली. तसेच प्रत्येक व्यक्तीने मृत्यूनंतर अवयव दान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी अवयव दान करण्याची प्रतिज्ञा डॉ.दत्तात्रेय फलके यांनी घेतली.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवानी उशीर हिने केले. सूत्रसंचालन ज्योती पवार तर साक्षी वस्ती या विद्यार्थिनीने आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळ 
लोणवाडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात व्याख्यान देताना डॉ.संजय रकिबे, आहेरगावचे सरपंच डॉ. उद्धव रसाळ, दावचवाडीचे डॉ.नवीन कोचर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. संपत खैरनार, प्रा.डॉ.दत्तात्रय फलके, प्रा. सचिन कुशारे, प्रा. अजय देशमुख आदी.