नाशिकमध्ये ‘नक्ष प्रोडक्शन’तर्फे भव्य टॅलेंट हंट ऑडिशन्स संपन्न
नाशिक (प्रतिनिधी) – नाशिकमधील Govardhan Farm येथे Naksh Production तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य टॅलेंट हंट ऑडिशन्सचा सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. गायन, नृत्य, अभिनय, मॉडेलिंग आणि लेखन अशा विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरासह परिसरातील कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. क्षमा अघोर, Nivedita Pagar, भूषण पाटील (सुजी करिअर इंडिया) आणि गुणमीत बग्गा (लोकल शाउट्स) यांनी केले. कार्यक्रमासाठी Wasan Toyota चे श्री तेजिंदर बेदी यांचे प्रायोजकत्व लाभले.

परीक्षक व मान्यवरांची उपस्थिती
ऑडिशन्ससाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परीक्षक म्हणून उपस्थिती दर्शवली.
-
पुष्पा ठाकूर (Khandesh Queen)
-
जगदीश संधान (Dadasaheb Phalke Awardee)
-
भातू चौधरी & इतर मान्यवर...
-
विलासकुमार – दिग्दर्शक व लेखक
-
अली भाऊ – समाजसेवक
-
उदय सर – शास्त्रीय संगीत अभ्यासक
-
नूतन मिस्त्री – मॉडेल व ग्रूमिंग एक्सपर्ट
मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांना मार्गदर्शनासह प्रोत्साहन मिळाले.
आयोजकांचे मनोगत
“नाशिकमध्ये दडलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि नवोदित कलाकारांना करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. स्पर्धकांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहून आम्हाला समाधान वाटते,” असे आयोजकांनी सांगितले.
या ऑडिशन्समधून निवड झालेल्या कलाकारांना पुढील टप्प्यात विशेष प्रशिक्षण व संधी देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
नक्ष प्रोडक्शनच्या या उपक्रमामुळे नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीला नवी चालना मिळाली असून, शहरातील नवोदित कलाकारांसाठी हा मंच महत्त्वाचा ठरणार आहे.

digitalnashik_admin




