उज्जैनकर फाउंडेशनच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांची निवड

उज्जैनकर फाउंडेशनच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांची निवड

नाशिक (प्रतिनिधी) डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर, जळगाव यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी बिटको महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कृष्णा शंकर शहाणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी काल ही घोषणा केली.

डॉ. कृष्णा शहाणे हे बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य या पदावर कार्यरत असून आर्थिक घडामोडींचे जाणकार आहेत.  डॉक्टर शहाणे यांनी त्यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र शहाणे यांचे समवेत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचे साठी 15  आणि इतर प्रकाशना साठी 6 अशी अर्थशास्त्रावरील एकूण 21 क्रमिक पुस्तके प्रकाशित केलेली असून. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून अर्थशास्त्र विषयावरील विविध संशोधन पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व नियोजन विभागाअंतर्गत येणाऱ्या नाशिक विभागीय (नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार) किंमत निर्देशांक समितीवर ते तज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत., मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड मुंबई खालसा कॉलेज मुंबई केळकर कॉलेज मुंबई यांच्या अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत. अर्थशास्त्र या विषयावर आकाशवाणी केंद्र नाशिक येथून त्यांची अनेक प्रख्याने प्रसारित झालेली आहेत. याशिवाय ते कांदा प्रश्नाचे जाणकार असून  या विषयावर ते पीएचडी प्राप्त आहेत. शेती समस्या कमी करणे तसेच शेती विकास या विषयावर त्यांनी अनेक वृत्तपत्रे,  साप्ताहिके यातून स्तंभलेखन केले आहे.

           याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, श्री कल्पेश गोसावी, अध्यक्ष डॉ.आर. पी. देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. सुहासिनी संत, नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सहाय्यक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सहाय्यक ब्रांच सेक्रेटरी डॉ. प्रणव रत्नपारखी, कुलसचिव गिरीश नातू, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे