प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाणे यांना इंदिरा युथ लीडरशिप अवॉर्ड प्रदान

प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाणे यांना  इंदिरा युथ लीडरशिप अवॉर्ड प्रदान

नाशिक  (प्रतिनिधी : श्री. संजय परमसागर ) गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित आर.एन.सी. आर्ट्स जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाणे यांना हॉटेल ताज गेटवे नाशिक येथे इंदिरा युनिव्हर्सिटी यांच्या वतीने "इंदिरा युथ लीडरशिप अवॉर्ड 2026" या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमास मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी ॲड. नितीन ठाकरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तरिता शंकर ह्या होत्या. तसेच हास्य कलाकार सिद्धार्थ जाधव यांनी नम्रता संभेराव, अमेय वाघ या कलाकारांची प्रकट मुलाखत घेतली तसेच उपस्थितांनी सिद्धार्थ जाधव नम्रता संभेराव आणि अमेय वाघ यांना विविध प्रश्न विचारले.

हॉटेल ताज गेटवे येथे झालेल्या या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांना इंदिरा युथ लीडरशिप अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

          डॉ. कृष्णा शहाणे हे बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथे प्रभारी प्राचार्य, अर्थशास्त्र विभाग प्रमुख या पदावर कार्यरत असून आर्थिक घडामोडींचे जाणकार आहेत, महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व नियोजन विभागाअंतर्गत येणाऱ्या नाशिक विभागीय किंमत निर्देशांक समितीवर ते तज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

डॉक्टर शहाणे यांनी त्यांचे बंधू डॉ. राजेंद्र शहाणे यांचे समवेत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचे साठी 15  आणि इतर प्रकाशना साठी 6 अशी अर्थशास्त्रावरील एकूण 21 क्रमिक पुस्तके प्रकाशित केलेली असून. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून अर्थशास्त्र विषयावरील विविध संशोधन पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड मुंबई खालसा कॉलेज मुंबई केळकर कॉलेज मुंबई यांच्या अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत. अर्थशास्त्र या विषयावर आकाशवाणी केंद्र नाशिक येथून त्यांची अनेक प्रख्याने प्रसारित झालेली आहेत. याशिवाय ते कांदा प्रश्नाचे जाणकार असून  या विषयावर ते पीएचडी प्राप्त आहेत. शेती समस्या कमी करणे तसेच शेती विकास या विषयावर त्यांनी अनेक वृत्तपत्रे,  साप्ताहिके यातून स्तंभलेखन केले आहे.

           याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, श्री कल्पेश गोसावी, अध्यक्ष डॉ.आर. पी. देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. सुहासिनी संत, नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सहाय्यक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सहाय्यक ब्रांच सेक्रेटरी डॉ. प्रणव रत्नपारखी, कुलसचिव गिरीश नातू, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कापसे,  आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तुमचा तालुका बुक करण्यासाठी खालील फॉर्म भरा:

https://forms.gle/ZFS9Nfz4rewzTRqPA