बिटको महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात अवतरले बॉलिवूड ....

बिटको महाविद्यालयात  वार्षिक स्नेहसंमेलनात अवतरले बॉलिवूड ....

नाशिकरोड :    गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि.२० जानेवारी ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत  ' सीबीसी नाशिकरोड फेस्ट ' या वार्षिक  स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा व डेज यांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे . यात आज दि. २२ रोजी टाकाऊतून टिकाऊ निर्मिती , निबंध व पथनाट्यस्पर्धा संपन्न झाल्या. त्याचप्रमाणे बॉलीवूड  डे मध्ये विद्यार्थ्यांनी बॉलीवूड डे निमित्त बॉलीवूड मधील कलाकारांची वेशभूषा करून सहभागी होऊन आपली अदाकारी दाखवून आपला आनंद द्विगुणीत केला. तसेच विविध स्पर्धा मध्ये भाग घेऊन आपले चूणुक दाखवली. पथनाट्य मध्ये विद्यार्थ्यांनी  प्रदूषण, जल साक्षरता  आदी विषयांवर प्रकाशझोत टाकून  आपली छाप पाडली. याप्रसंगी उपस्थित  परीक्षक, स्पर्धा प्रमुख व समिती, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्पर्धकांनी कलाकौशल्य सादर केले.  याप्रसंगी प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. के. सी. टकले, डॉ. आकाश ठाकूर, सौ. सुनिता नेमाडे,  डॉ. उत्तम करमाळकर, डॉ. संतोष पगार, डॉ. गाडेकर, डॉ. शरद नागरे, डॉ. आरती गायकवाड, डॉ. गीतांजली चिने,प्रा. राजेश होन, किरण पाटील तसेच स्पर्धेचे परीक्षक, स्पर्धाप्रमुख व समिती सदस्य, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.