के.व्ही.एन. नाईक महाविद्यालय सिन्नर येथील विद्यार्थिनीची विद्यापीठ स्तरीय जल्लोष 2025 मध्ये मेहंदी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

के.व्ही.एन. नाईक महाविद्यालय सिन्नर येथील विद्यार्थिनीची विद्यापीठ स्तरीय जल्लोष 2025 मध्ये मेहंदी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, महाविद्यालयातून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर येथे झालेल्या 'जल्लोष 2025' विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत मेहंदी या कला प्रकारात कु. स्नेहा भाऊसाहेब कुऱ्हे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक  मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. व ही विद्यार्थीनी राज्यस्तरीय जल्लोष 2025 स्पर्धेसाठी  पात्र ठरली आहे. या विद्यार्थिनीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. कोंडाजी (मामा) आव्हाड, उपाध्यक्ष मा.श्री. उदय घुगे, सरचिटणीस मा.श्री. हेमंत (आप्पा) धात्रक, सह सरचिटणीस मा. श्री .दिगंबर (नाना) गीते, संस्थेचे विश्वस्त मा. श्री. नामदेवराव काकड, संचालक मा. श्री. जयंत बाबूजी आव्हाड, संचालक मा. श्री. समाधान गायकवाड, संचालक मा.श्री. हेमंत शेठ नाईक, संचालिका नंदाताई भाबड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले  या सर्व मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यांनीला स्पर्धेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी स.प्रा. डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक समन्वयक स. प्रा. पुनम कुटे व क्रीडा विभाग प्रमुख स. प्रा. अमोल आव्हाड यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.