श्री सप्तशृंगी महाविद्यालयात रा. से.योचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहत
तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे ता. बागलाण जिल्हा नाशिक येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसाचा विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला 'शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन' या स्कीमच्या आधारे तसेच समाजसेवा, श्रम प्रतिष्ठा आणि ग्रामीण विकास या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर विठ्ठल हिरे प्राचार्य श्री सप्तशृंगी महाविद्यालय तर माननीय डॉ. डी. के आहेर (राष्ट्रीय सेवा योजना) जिल्हा समन्वयक व प्रमुख अतिथी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री संजय पंडितराव सोनवणे ग्रामसेवक आर. जी गायकवाड व दहिंदुले गावचे ग्रामस्थ हजर होते कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक डॉ. आहेर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती, नेतृत्वगुण, राष्ट्रप्रेम, भावना निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना सातत्याने करीत आहे असे प्रतिपादन केले. तसेच मा. संस्थेचे अध्यक्ष श्री संजय पंडितराव सोनवणे यांनी विद्यार्थी हा समाजाचा दीर्घकालीन सकारात्मक बदल घडू शकतो व अनुभवातून शिकण्याची संधी देते असे त्यांनी सांगितले, तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविकाने विद्यार्थ्यांना समाजाशी जोडण्याचे महत्व पटवून दिले तसेच अध्यक्ष भाषणात प्राचार्य हिरे यांनी गावाच्या विकासासाठी स्थानिक युवकांनी संघटितपणे काम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना महिला अधिकारी प्राध्यापिका रेना बाविस्कर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना चे अधिकारी नाडेकर आर.डी यांनी केले कार्यक्रमासाठी दहींदुले ग्रामस्थ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री बंटी हिरे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी हजर होते.


digitalnashik_admin




