अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालय आयोजित वर्चस्व 3.0 या उपक्रमात गायत्री रसाळ व ऋषिकेश गाडेकर यांनी रांगोळी स्पर्धेत पटकवले द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर या महाविद्यालयातून कु गायत्री देवराम रसाळ (TyBcom) व चि. ऋषिकेश धनंजय गाडेकर (TyBsc) या विद्यार्थ्यांनी अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालय संगमनेर आयोजित वर्चस्व 0.3- 2026 या उपक्रमा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या रांगोळी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. या विद्यार्थ्यांनी "पर्यावरण जागरूकता" या विषयावर समर्पक रांगोळी काढून हे पारितोषिक मिळवले. याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उपाध्यक्ष श्री उदयभाऊ घुगे, सरचिटणीस श्री हेमंतआप्पा धात्रक, सहचिटणीस श्री दिगंबरनाना गीते,विश्वस्त श्री नामदेवराव काकड, संस्थेचे संचालक श्री हेमंत शेठ नाईक, श्री जयंत आव्हाड, श्री समाधान गायकवाड, संचालिका सौ नंदाताई भाबड या सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या मार्गदर्शना खाली या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख स.प्रा.अमोल आव्हाड, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड व सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा. पुनम कुटे यांचे मार्गदर्शन मिळाले.

digitalnashik_admin




