बिटको महाविद्यालयात ' ७७ वा प्रजासत्ताक दिन ' उत्साहात साजरा...
नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ' ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन ' उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कृष्णा शहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी व एअरविंगच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक सामूहिक नृत्य सादर केले . तसेच एनसीसी व एयरविंग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना ' स्व. श्रीकांत वैद्य ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्या डॉ.कृष्णा शहाणे यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कला शाखा उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, डॉ. सतीश चव्हाण, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, लेफ्टनंट डॉ. विजय सुकटे, देवेंद्र हातखंबकर,सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या श्रद्धा देशपांडे, डॉ.फारुख मुलानी, डॉ. दीपक टोपे, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष डॉ. लक्ष्मण शेंडगे, सुहास माळवे, राहुल पाटील, नरेश पाटील,क्रीडाशिक्षक धनंजय बर्वे, योगेश शिंदे, जयराम हायस्कूलचे मुख्याध्यापक शालिनी खरे , जे.एन.अहिरे,जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमलता तांबोळी, दिलीप उदमाले, रजिष्ट्रार राजेश लोखंडे तसेच राजेंद्र साळुंके यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. त्यानंतर पीएचडी व पुरस्कार प्राप्त मिळालेल्या प्राध्यापकांचा व शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला.

digitalnashik_admin




