सिन्नर व्ही एन नाईक महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज महाविद्यालयाच्या प्रांगणात 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. दत्तात्रेय डोंगरे सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी भूषवले. प्रमुख अतिथी मा श्री दत्तात्रय डोंगरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत भारत हे सार्वभौम राष्ट्र असून राष्ट्रहित जोपासणे ही आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. ज्योती गायकवाडआपल्या मनोगतातून देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पखाले यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना प्रणाम केला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून त्यांनी दिलेल्या संविधानाचे पालन व रक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल आव्हाड यांनी केले तर प्रा. ज्ञानेश्वर चकोर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

digitalnashik_admin




