देवळा महाविद्यालयात एड्स दिन साजरा

ग्रामीण रुग्णालय देवळा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. योगेश आहिरे, समुपदेशक प्रविण देवरे, सहाय्यक अधिक्षक देविदास सहाणे, प्र. तंत्रज्ञ भूषण खैरनार, रविंद्र निकम, राजेंद्र येवला, गुलाब साबळे, शिवाजी गांजे, भरत पाटील,उपप्राचार्य आर एन निकम, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. आर. भामरे, डॉ. राकेश घोडे, डॉ. जयमाला चंद्रात्रे, प्रा. आर. पी. चौधरी व सर्व प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते.
रॅलीची सांगता समुपदेशक प्रविण देवरे यांनी शपथ देवून करण्यात आली.
रॅली यशस्वीतेसाठी लिंक वर्कर राहुल जाधव व निलेश बच्छाव यांनी परिश्रम घेतले.