तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्राध्यापक पुरस्कारांची घोषणा
नाशिक जिल्ह्यातून डॉ. कृष्णा शहाणे, डॉ.प्रशांत रणसुरे यांचा समावेश
नाशिक (प्रतिनिधी) डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांचे 16 व्या वर्धापन दिनानिमित्त तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारार्थींची घोषणा नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी केली.
तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य, मुख्याध्यापक पुरस्कार= वामन लक्ष्मण सुरडकर बुलढाणा, नितीन प्रल्हाद भोंबे, मुक्ताईनगर, एम.आर.चौधरी, भुसावळ, किशोर नारायण चौधरी मुक्ताईनगर, ज्ञानदेव श्रीकृष्ण वनारे, वडोदा, दत्तू शेनपडू पाटील, चारठाणे, डॉ.योगेश तुळशीराम सोनवणे.
तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, प्राध्यापक पुरस्कार = बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शंकर शहाणे, नााशिक, त्रंबकेश्वर महाविद्यालय येथील प्रा. डॉ. प्रशांत वसंत रणसुरे, नाशिक प्रा. डॉ. कल्पना दामोदर गोरले, अकोला, सौ.सविता जितेंद्र महाजन, भुसावळ, मुकेश एकनाथ जुंबळे, हरताळा, प्रा.विनोद प्रतापसिंग परिहार , मुक्ताईनगर, सौ.सरला जितेंद्र पाटील, मुक्ताईनगर, सौ.वैशाली बिपिन झोपे जळगाव, श्रीमती ज्योती लीलाधर जळगाव, अरविंद रामहरी शिंगाडे, बुलढाणा, सुशीलकुमार रमेश झोपे, जळगाव, सौ.अलकनंदा रमेश परिहार, वरखेड जिल्हा बुलढाणा, स्मिता मुरलीधर कोलते, बुलढाणा, तुळशीराम उरकुडे, मुंबई.
आयएसओ मानांकन प्राप्त तथा भारतीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगावचा दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी 16 व्या वर्धापन दिनानिमित्त तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार एका समारंभात मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे प्रदान केले जातील अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी दिली.

digitalnashik_admin




