वित्तीय समावेशन व कर्ज मेळावा वडांगळी येथे उत्साहात संपन्न

दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर येथे बँक ऑफ महाराष्ट्र, वडांगळी शाखेच्या वतीने वित्तीय समावेशन व कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात 5 बचत गटांना मिळून 19 लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत लाभार्थी
-
बाळासाहेब शेळके
-
सुरेश भोर
-
अरुण विरनारायण
यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या विमा धनादेशाचे वितरण बँक ऑफ महाराष्ट्र चे झोनल मॅनेजर श्री. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. देशमुख म्हणाले, “प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उद्देश कुटुंबियांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.”
मेळाव्यात पुढील केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली –
-
नवीन खाते उघडणे व बंद खाती सक्रिय करणे
-
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना
-
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
-
अटल पेन्शन योजना
-
महिलांचे बचत गट खाती व कर्ज योजना
-
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
-
NPS वात्सल्य योजना
-
सुकन्या समृद्धी योजना
कार्यक्रमास श्री. राजेश देशमुख (ZM), जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक भिवा लवटे, वडांगळी शाखा अधिकारी मयूर शेटे, उपप्रबंधक संतोष भोर, आर्थिक साक्षरता सल्लागार अनुराधा लोंढे, ऑफिसर पियूश झा, कॅशियर धीरज वरखडे, शिपाई श्याम बर्डे आदी अधिकारी उपस्थित होते.
तसेच गावातील मान्यवरांमध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुदेश दादा खुळे, उपसरपंच अनिता क्षत्रिय, ग्रामसेवक चित्ते साहेब, दिलीप ठेंगे, बद्रीनाथ कोकाटे, प्रमोद म्हाळणकर, गणेश कडवे, वाल्मीक आभाळे यांचा सहभाग होता.
ग्रामस्थ व लाभार्थ्यांनी सरकारच्या विविध योजनांबाबत समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे स्वागत केले.