महिला दिनानिमित्त रणरागिणी पुरस्कार सोहळा संपन्न

महिला दिनानिमित्त रणरागिणी पुरस्कार सोहळा संपन्न

आज दिनांक 10 मार्च 2026 रोजी स्वामी असोसिएशन (strengthening workers association for marginalised entity) यांच्यावतीने महिला दिनाच्या अवचित्य साधून 25 महिला उद्योजकांना रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले करण्यात आले होते. महिलांनी उद्योगाकडे वळले पाहिजे तसेच समाजातील दरी दूर करण्यासाठी कायदेविषयक सबलीकरण व्हायला आहे. तसेच आर्थिक सबलीकरण व्हायला हवेत. सामाजिक सबलीकरण व्हायला हवेत. तसेच राजकीय सबलीकरण व्हायला हवे म्हणून सदर कार्यक्रमात महिलांना आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचवटी पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय मा. अर्चना वाघ मॅडम उपस्थित होत्या त्यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांना कायदेविषयक माहिती दिली व महिलांना आपल्या हक्काची जाणीव करून दिली तसेच दुसऱ्या प्रमुख पाहुण्या मान्य नीलम ताई पाटील नगरसेविका पंचवटी विभाग यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांना असा सल्ला दिला की राजकीय क्षेत्रात महिलांनी सहभाग नोंदवला पाहिजे व तसेच राजकीय क्षेत्रात आपला ठसा  उमटवण्याचे काम महिलांनी केले पाहिजे असे आवाहन त्यांनी महिलांना केले.

तसेच पुढील पाहुण्या व मार्गदर्शक मा . सहाय्यक लोक अधिकरक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट,एडवोकेट अश्विनी शर्मा मॅडम, यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कडील सुविधांबाबत माहिती दिली तसेच महिलांनी कोणताही अत्याचार सहन न करता सामाजिक लढा दिला पाहिजे, असा विश्वास दिला. 

तसेच पुढील मान्यवर मा. अनुराधा लोंढे मॅडम, आर्थिक साक्षरता सल्लागार  महाराष्ट्र बँक यांनी महिलांनी स्वयंरोजगार निर्माण कसा करावा व बचती सवयी लावावी तसेच विविध बँकांकडे असलेले छोटेखानी उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत याबद्दल माहिती दिली. तसेच स्वामी असोसिएशनच्या माध्यमातून 25 उद्योजक महिलांना रणरागिणी पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार हा महिलांचे मनोधर्य वाढवण्यासाठी देण्यात आला आहे सदर कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री किरण काळे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. 

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरिता बत्तीसे  व कुमारी छाया आव्हाड यांनी केले. 

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रमोद जांगडा यांनी केले. 

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. 

प्रतीक साळवे, शेती जीवनावणे, वैष्णवी दोंदे, दमयंती पाडवी, 

यांनी योगदान दिले.