सिन्नर येथे गुरु पौर्णिमा आणि राष्ट्र संत श्री भगवान बाबा यांची जयंती साजरी
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरु पौर्णिमा आणि राष्ट्र संत श्री भगवान बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त माननीय श्री नामदेवराव काकड साहेब उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक माननीय श्री समाधान गायकवाड साहेबांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आपल्या गुरुचे महत्व वेगवेगळ्या गुरु शिष्यांचे दाखले देत पटवून दिले. तसेच संचालक माननीय श्री बंडूनाना भाबड यांनी आपल्या भाषणातून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या कार्याची महती अतिशय मार्मिक शब्दात सांगितली . आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे ह.भ. प. योगेश महाराज आव्हाड यांनी आपल्या मनोगतातून प्रथम गुरु आई वडील आणि शिष्याच्या जीवनात गुरुचे महत्व अतिशय मार्मिक शब्दात मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले सर यांनी केले प्रस्ताविकेतून गुरु पौर्णिमेचे महत्व सांगून राष्ट्र संत श्री भगवान बाबा यांना आपल्या शब्दातून आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा आणि संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्नेहा काळे, सत्यम मुजुमदार, कार्तिक घुगे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुपौर्णिमेचे तसेच श्री संत भगवान बाबा यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. सहाय्यक प्राध्यापिका स्वाती चोथवे मॅडम यांनीही भगवान बाबांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. सूत्रसंचालन बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी बोडके आणि समृद्धी साबळे यांनी केले . या कार्यक्रमासाठी माननीय श्री.रवींद्र खैरनार उपस्थित होते.तसेच प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सीनियर ज्युनिअर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

digitalnashik_admin




