ऋतुरंग भवन मध्ये ९ ऑक्टोबर रोजी ' मेहेकी यादे -एक शाम अमिताभ- रेखाके नाम ' बहारदार गीतांचा कार्यक्रम...
नाशिकरोड : एस व्ही कराओके सिंगिंग क्लब, नाशिकरोड आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकी यादे -एक शाम अमिताभ रेखा के नाम ' ( पुष्प १० वे ) हा कार्यक्रम शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे. यात एकूण २२ गायक आपले गायन कौशल्य सादर करणार आहेत. महानायक सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेत्री रेखा यांच्या सुपरहिट चित्रपटातील बहारदार हिंदी गाजलेल्या गीतांचा आनंद अनुभवता येणार आहे . यात गायक संजय परमसागर यासह विनोद बर्वे, गॉडविन लुईस, वनिता आहेर , दत्तात्रय पाटील, सुदेश आमेसर, डॉ. सुनायना भुजबळ, स्वप्ना गोखले, वैशाली राजपुत, स्मिता पोटे, विठ्ठल श्रीवंत, परमेश्वर चिंतकिंदी, अनिल पांचाळ, संतोष जोशी, राजेंद्र माळी, प्रितम आमेसर, अनुपमा क्षीरसागर, प्रज्ञा गोपाळे, रोहीत कुलकर्णी, पद्मा देशपांडे,अर्चना पगारे, वैशाली बर्वे आदी गायक आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर करणार आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन नीता देशमुख करणार आहेत . कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. उपस्थित ३ भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तु दिली जाईल. कार्यक्रमास प्रवेश मोफत असून जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे संयोजकांनी कळवले आहे

digitalnashik_admin




