एस एस के पब्लिक स्कूल, क्रिकेट संघांचे तालुकास्तरावर घवघवीत यश
नायगांव : नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालय, नाशिक व सिन्नर तालुका क्रीडा समिती यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एसएसके पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नायगांवच्या १४ वर्षांखालील मुलांच्या, १७ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे, अध्यक्षा कुसुम शिवाजीराव कातकाडे, संचालिका उज्ज्वला कातकाडे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक संग्राम कातकाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता नंद, अविनाश जेजुरकर, मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक प्रा. कपिल शिरसाठ आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

digitalnashik_admin




