नाशिक -येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न

नाशिक :- " आयआयएस म्हणजे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ स्किल्स द्वारे नवनवीन आधुनिक तंत्र व कौशल्य उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देऊन या द्वारे प्रशिक्षण देऊन मोठ्या उद्योग समूहात संधी उपलब्ध करून रोजगारक्षम बनवणे गरजेचे असून रतन टाटांनी टाटा मोटर्स व टाटा टी प्रकल्प उभारतांना अनेक जागतिक मोठ्या उद्योगाचे तंत्र व कौशल्य व घेतलेल्या मेहनतीने आपले अनेक प्रकल्प नावारूपाला कसे आणले. नवनवीन एआय व ब्लॉक चेन सारखे तंत्र कौशल्ये प्राप्त करून ज्ञान आदानप्रदान माध्यमातून ग्लोबल मार्केट मध्ये आपले स्थान मिळवा, " असे टाटा ट्रस्टचे श्री एच. एन. श्रीनिवास यांनी मार्गदर्शन करतांना केले.
गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक वतीने दि. १९ एप्रिल २०२५ रोजी गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या पद्मविभूषण श्री रतन टाटा स्मृती व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मार्गदर्शन करतांना बोलत होते. त्यांनी आपल्या ट्रस्ट मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व कौशल्य प्रशिक्षण राष्ट्र उभारणीत महत्वपुर्ण योगदान कसे देऊ शकतो याबाबत माहिती दिली.
याप्रसंगी मंचावर टाटा ट्रस्टचे श्री. एच. एन. श्रीनिवास, युनिव्हर्सल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रशांत खंबासवाडकर, संस्थेचे प्रेसिडेंट डॉ. आर. पी. देशपांडे, नाशिक विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, प्रकल्प संचालक डॉ. पी. एम. देशपांडे, , अक्षय देशपांडे, प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, केंद्रीय समन्वय समितीच्या समन्व्यक डॉ.अंजली कुलकर्णी, डॉ. एस. व्ही. संत या मान्यवरासह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव व खजिनदार प्राचार्याडॉ. दिप्ती देशपांडे होत्या.
कार्यक्रमाचा प्रारंभ एसएमआरके महाविद्यालयाची विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी बागुल हिने ईशस्तवन सादर करून सोसायटी गीताने झाले . त्यानंतर रतन टाटा यांच्या जीवनावरील माहितीपट सभागृहातील उपस्थितांना दाखवण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रतन टाटा यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प व हार अर्पण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांनी करून दिला.
सन्माननीय अतिथी प्रशांत खंबासवाडकर यांनी आपल्या मनोगतात ' मेक इन इंडिया 'च्या उपक्रमात आपणही उच्च तंत्रज्ञान मिळवून, नवीन संशोधनाच्या माध्यमातून स्किल डेव्हलोपमेंट मिशन मध्ये सहभागी होऊन राष्ट्र उभारणीत व विकासात सहभागी व्हा व चांगले करिअर करा , सक्षम बना असे सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. दीप्ती देशपांडे यांनी, " फार प्राचीन काळापासून आपण विविध विकासात व संकटाप्रसंगी युद्धनीती मध्ये व इतर कामासाठी विविध कौशल्यांचा व तंत्राचा उपयोग करत आलो आहोत. संस्थेचे आधारवड माजी अध्यक्ष दिवंगत प्राचार्य एस. बी. पंडित व शिक्षणमहर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या मार्गदर्शनातून नाशिक, पालघर व मुंबई या विभागातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्टाफ ट्रेनिंगच्या माध्यमातून स्टाफ व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करणे, हा उद्देश आहे . " असे सांगितले .
याप्रसंगी संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक यासह विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला सूत्रसंचालन डॉ. स्नेहा रत्नपारखी व डॉ. मुग्धा जोशी यांनी केले तर आभार सहायक शाखा सचिव डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी मानले.
कार्यकमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ लीना भट व त्यांच्या सर्व टीमने परिश्रम घेतले