प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती विशेष प्राध्यापक पुरस्कार प्रदान
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा विशेष प्राध्यापक पुरस्कार बिटको महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजक भगूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संग्राम करंजकर यांनी केले, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी ॲड. नितीन ठाकरे, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी हेमंत धात्रक आदी मान्यवर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक पुरस्कार याप्रसंगी प्रदान करण्यात आले.
डॉ. कृष्णा शहाणे हे बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य या पदावर कार्यरत असून आर्थिक घडामोडींचे जाणकार आहेत. डॉक्टर शहाणे यांनी त्यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र शहाणे यांचे समवेत एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचे साठी 15 आणि इतर प्रकाशना साठी 6 अशी अर्थशास्त्रावरील एकूण 21 क्रमिक पुस्तके प्रकाशित केलेली असून. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून अर्थशास्त्र विषयावरील विविध संशोधन पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड मुंबई खालसा कॉलेज मुंबई केळकर कॉलेज मुंबई यांच्या अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत. अर्थशास्त्र या विषयावर आकाशवाणी केंद्र नाशिक येथून त्यांची अनेक प्रख्याने प्रसारित झालेली आहेत. याशिवाय ते कांदा प्रश्नाचे जाणकार असून या विषयावर ते पीएचडी प्राप्त आहेत. शेती समस्या कमी करणे तसेच शेती विकास या विषयावर त्यांनी अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके यातून स्तंभलेखन केले आहे.
याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, श्री कल्पेश गोसावी, अध्यक्ष डॉ.आर. पी. देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. सुहासिनी संत, नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सहाय्यक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सहाय्यक ब्रांच सेक्रेटरी डॉ. प्रणव रत्नपारखी, कुलसचिव गिरीश नातू, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कापसे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


digitalnashik_admin




