श्री सप्तश्रुंगी महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व गुणवत्ता हमी कक्ष तर्फे महात्मा जोतीराव फुले यांची २०० वी जयंती (११ एप्रिल २०२६) हे द्विशताब्दी वर्ष म्हणून साजरी केली जात असून त्यानिमित्ताने महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर विठ्ठल हिरे हॆ होते. तर कार्यक्रमाचे अतिथी संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय पंडितराव सोनवणे होते.कार्यक्रमाचे अतिथी यांनी शिक्षण आणि सामाजिक कार्य: फुले यांनी गुलामगिरी (१८७३) या पुस्तकातून जातीव्यवस्थेवर टीका केली आणि स्त्री शिक्षणासाठी क्रांतिकारक काम केले.असे प्रतिपादन केले तर प्रा. नाडेकर यांनी महात्मा फुलेच्या शिक्षण, अस्पृश्यता निवारण, सत्यशोधक समाजाची स्थापना अशा कार्यविषयी माहिती दिली.अध्यक्ष भाषणात शिक्षण हेच समाजाच्या विकासाचे खरे माध्यम आहे, असे मानणाऱ्या या महापुरुषाचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. असे मार्गदर्शन केले.तसेस महाविद्यालयत रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रीना बाविस्कर यांनी केले तर आभार प्रा. लोटन जाधव यांनी मांडले. कार्यक्रमासाठी कोमल भांगरे, प्रा. सोनवणे कोमल, प्रा. भांगरे कोमल प्रा. हर्षल जगताप प्रा. जितेंद्र सावंत, , प्रा. शशिकांत बच्छाव, श्री. आहेर एस. टी, श्री. बागुल मोहन, श्री. जाधव विजय, श्री. जगदीश भामरे श्री. भाग्येश देशमुख विद्यार्थी व राष्ट्रीय योजना स्वयंसेवक हजर होते.


digitalnashik_admin




