राष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेसाठी सार्थक शहाणे आणि संचिता ढिकले यांच्या प्रकल्पाची निवड
नाशिक (प्रतिनिधी) के के वाघ बी.टेक. कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी येथील प्रथम वर्षाचे विद्यार्थी सार्थक कृष्णा शहाणे आणि संचिता रूपचंद ढिकले यांनी तयार केलेल्या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय पातळीवर झालेली आहे.
त्यांनी तयार केलेल्या ऍग्रो विस्टा या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर सतराव्या क्रमांकाने निवड झालेली आहे. या अंतर्गत साठवणूक केलेल्या बियाणांचे पावसापासून संरक्षण करण्या साठी त्यांनी उपाय सुचवले आहेत. हरितगृह तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याची बचत यांचा वापर सदरच्या प्रकल्पात केलेला असून शेतीतील पिकाचे संरक्षण यावर देखील प्रकाश टाकलेला आहे.
कर्नाटक येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी नाशिक शहरातून या एकमेव प्रकल्पाची निवड झालेली आहे
या दोन विद्यार्थ्यांच्या टीमने आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक कौशल्य आणि समस्यांवर प्रभावी उपाय मांडत देशभरातील स्पर्धकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली असून
ही हॅकथॉन स्पर्धा देशातील तरुणांना तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्य आणि सर्जनशीलतेला वाव देणारी मानली जाते. स्पर्धेमध्ये अनेक संघांनी अत्याधुनिक प्रकल्प सादर केले असताना, सार्थक आणि संचित यांच्या टीमने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने राष्ट्रीय पातळीवरील पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे.
आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, "राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची ही संधी असून आम्हाला या संदर्भात अधिक अनुभव प्राप्त होईल यातून अभ्यासास मदत होईल."
या यशाबद्दल महाविद्यालचे प्राचार्य एम.जी. देवशेटे, प्रा. बनकर आणि इतर प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर तरुणांनाही अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नाविन्यपूर्ण कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे


digitalnashik_admin




