के .व्ही.एन.नाईक महाविद्यालयात आय.क्यू.ए. सी.विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित...
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी आय.क्यू.ए.सी विभाग व सक्सेस जॉब प्लेसमेंट सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष कला,वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले व श्री. गणेश आव्हाड (Director Sucsess job placement) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर दिव्या आढाव (Branch Manager),साक्षी पगार (HR Recruiter), मोनिका घेल (HR Executive), धनश्री बोडके (HR Officer),जया आव्हाड(HR Executive),श्री. अनिल पाटील (Bajaj Finserv), श्री. रोहित सांगळे (Sales Manager, Maruti Suzuki) व श्री. सोमेन चव्हाण (Insurance dept, Maruti Suzuki) इ.प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकामधून आयक्यूसी कॉर्डिनेटर डॉ. ज्योती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी मिळावी यासाठी हा अभिनव उपक्रम महाविद्यालयातर्फे घेतला जात असल्याचे स्पष्ट केले, सक्सेस जॉब प्लेसमेंट चे डायरेक्टर श्री. गणेश आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी निर्माण होणे गरजेचे असून महाविद्यालय व सक्सेस जॉब प्लेसमेंट सिन्नर शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी देखील विद्यार्थ्यांना या रोजगार मेळाव्याअंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या व सक्सेस प्लेसमेंट चे आभार व्यक्त केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखती दिल्या, अनेक विद्यार्थ्यांचे रिझ्युम कंपन्यांकडून शॉर्टलिस्ट केले गेले असून तृतीय वर्ष कला विभागातील चि. शुभम संतोष गांजवे या विद्यार्थ्याचे एका नामवंत कंपनीत स्पॉट सिलेक्शन झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी स.प्रा. अमोल आव्हाड यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी स.प्रा. पूनम कुटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमचा तालुका बुक करण्यासाठी खालील फॉर्म भरा:

digitalnashik_admin




