क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालय सिन्नर येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालय सिन्नर येथे  लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक समाधान गायकवाड हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी केले. महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अमोल आव्हाड यांनी लोकमान्य टिळक यांचे कार्य व कर्तृत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील कांचन कुशारे प्रतीक्षा भाबड आदी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन केले. संस्थेचे संचालक समाधान गायकवाड यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनपटाचा सखोल आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त करत त्यांना अभिवादन केले. लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनुकरण करण्याची नितांत गरज असल्याचे यावेळी समाधान गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव काकड यांनी देखील आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक यांना अभिवादन करत आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. मंगल सांगळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. डॉ. ज्योती गायकवाड यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पूनम कुटे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड, करियर कट्टा समन्वयक प्रा. सिद्धीका सानप इतर प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.