' भारतीय शिक्षण, संशोधन आणि ज्ञानाचे आदान-प्रदान ' या विषयावर एम. सी. ई. ए. एम ची राष्ट्रीय परिषद बिटको महाविद्यालयात

' भारतीय शिक्षण, संशोधन आणि ज्ञानाचे आदान-प्रदान ' या विषयावर एम. सी. ई. ए. एम ची राष्ट्रीय परिषद बिटको महाविद्यालयात

 नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील आरएनसी आर्ट्स, जेडीसी कॉमर्स अँड एनएससी सायन्स ( चांडक- बिटको ) महाविद्यालय, नाशिकरोड येथे दि. २७ व २८ डिसेंबर २०२४ रोजी  ' महाराष्ट्र कौन्सिल ऑफ एज्युकेशन ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट पुणे , गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक आणि डॉ. एमएसजी फाउंडेशन , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने " भारतीय शिक्षण, संशोधन आणि ज्ञानाचे आदान-प्रदान " या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषदेचे उद्घाटन दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता बिटको महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये होणार असून उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट श्री. प्रकाशजी पाठक, सन्माननीय पाहुण्या प्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड, कार्यक्रमाच्या एम सी ई ए एम च्या अध्यक्षा डॉ. दीप्ती देशपांडे ,  एम सी ई ए एम चे सेक्रेटरी डॉ. के आर शिंपी आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत . सदर परिषदेत एकूण चार तांत्रिक सत्रे , दोन गौरव व्याख्याने, प्रदर्शन तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम  इत्यादी कार्यक्रम होणार आहेत . प्राचार्य डॉ. एस. पी. कल्लूरकर, डॉ. एस. एस.साने, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, डॉ. संध्या खेडेकर तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर हे प्रमुख पाहुणे तर डॉ. दिलीप धोंडगे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी  महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवीवर्षा निमित्ताने महाविद्यालयाच्या वाटचालीत  विशेष योगदान देणाऱ्या सन्माननीय  देणगीदार, माजी प्राचार्य, सन्माननीय माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेसाठी  विविध शाळा व महाविद्यालयातील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ एज्युकेशन ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट पुणे यांचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ. दीप्ती देशपांडे , सचिव डॉ.के आर शिंपी, डॉ. व्ही झेड साळी, डॉ. एस आर. एडके, डॉ. आर. एम. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. व्ही. एन.सूर्यवंशी, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे तर एमएसजी फाउंडेशनचे श्री. के. एम. गोसावी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.  संयोजन समितीच्या प्राचार्य व कॉन्फरन्स डायरेक्टर प्र.प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, कन्व्हेनर डॉ.  अनिलकुमार पठारे, को- कन्व्हेनर  डॉ. आकाश ठाकूर, कॉर्डिनेटर डॉ. के सी टकले, सर्व संयोजन समितीतील प्रमुख, सदस्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत व त्यांनी परिषदेत सहभागी होण्यासाठी आवाहन  केले आहे.