' गीत गाता चल ' कार्यक्रमात रसिक झाले दंग.....
नाशिक :- अफलातून म्युझिक लव्हर्से अध्यक्ष श्री हरिषभाई ठक्कर यांची संकल्पना असलेला ' गीत गाता चल ' भाग- १० वा हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम स्वर्णिमा हॉल, इंदिरानगर येथे अफलातून जल्लोषात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात लोकप्रिय गायक कलाकार श्री राजेंद्र पवार,मोहनभाऊ पवार,राज अक्कर, प्रभाकर जाधव,कुणाल खरे,संजय दुलगज, गायिका सौ. स्नेहा केदारे ,रेखा तावडे,संगीता दुसाने, ज्योती कोलते,सविता खोडके यांनी एक से बढकर एक गाणी सादर करून रसिक श्रोते यांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळवली.
गायक कलाकारांनी आपल्या टिमचे कोच वर्षा संगम व सुगंधा शेलार यांच्या नेतृत्वाखाली खाली जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला.
श्री हरिषभाई ठक्कर यांनी नियोजन समितीत अनिलभाऊ पोटे, संतोषभाऊ देहूकर, सुगंधा शेलार, वर्षा संगम यांना दिलेली कार्यक्रमाची जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडली.

कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या रियल जोडीना गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. महागायक गायक ऑफ मंथ चे मानकरी श्री संजय परमसागर आणि सौ. ज्योती कुलकर्णी यांचा सुध्दा अफलातून ग्रुपचा मोमेंटो व गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात श्री गिरीषभाई ठक्कर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे निवेदन सौ.सुहासिनी बुरकुले यांनी दिलबहार चौफेर फटकेबाजी करत दिलखुलासपणे केले. या कार्यक्रमात अक्षय फाउंडेशनच्या मोनादिदीने केलेला सांताक्लॉजचा पेहराव व डांन्स हे कार्यक्रमाचे आकर्षण होते. श्री अनिल पोटे यांनी अक्षय फाउंडेशनला रोख आर्थिक मदत केली.
साऊंड सिस्टीम श्री पवन रोकडे आणि व्हिडिओ फोटोग्राफी श्री संजय गाडे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली.

digitalnashik_admin




