राजराजेश्वरी प्रतिष्ठान व नाथजोगी समाज भक्त मंडळ वतीने धर्मनाथ बीज उत्साहात साजरी.....
नाशिकरोड: राजराजेश्वरी प्रतिष्ठान व नाथजोगी समाज भक्त मंडळ वतीने राजराजेश्वरी मंगल कार्यालय , नाशिकरोड येथे ' धर्मनाथ बीज ' दि. १९ व २० जानेवारी अशी दोन दिवस उत्साहात साजरी करण्यात आली . प्रारंभी या सोहळ्यात ध्वजपूजन, ध्वजारोहण, पंडित विनायक गंधे यांनी सपत्नीक शंखनादामध्ये केले . त्यानंतर चिमटा व त्रिशूल, अखंड धुनी, अखंड दीप प्रज्व्लन, गुरु पादुका यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री गोरक्षनाथ प्रतिष्ठा करण्यात आली. आलेल्या सर्व नाथ बंधू भगिनींचे स्वागत माजी जिल्हाधिकारी व नाथभुषण पुरस्काराने सन्मानित रघुनाथजी राठोड यांनी केले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री गणेश पूजन , हनुमान पुजन, कालभैरव पूजन, श्री सद्गुरु गोरक्षनाथ प्रतिमा पूजन उपस्थित जोडप्यांच्या हस्ते होऊन गोरक्ष गायत्री मंत्र पुष्पांजली, होमहवन, गोरक्ष सहस्रनाम मंत्र पुष्पांजली, श्री सद्गुरु गोरक्षनाथ महाआरती व त्यानंतर महाप्रसाद असा कार्यक्रम संपन्न झाला .

या बीज उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अभिजित खरे, , आशुतोष राठोड, किरणनाथ चव्हाण, संजयनाथ परमसागर, वासुदेवनाथ ताडे, शिरीष सोने, विनायकुमार पवार, , आधारगिरी गोसावी, सुधीर वाघमारे, राजशेठ राठोड, अंजली राठोड, वैशालीताई राठोड, निर्मल वाघमारे,कमलाकरनाथ चव्हाण, तुषारनाथ पवार, अनिल कापसे, सागर हिरडे, नारायण कापसे, ,आण्णानाथ घोंगडे यासह नाथजोगी समाज व नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

digitalnashik_admin




