स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेच्या वतीने राजीव गांधी भवन येथे अभिवादन.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेच्या वतीने राजीव गांधी भवन येथे अभिवादन.

नाशिक – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४२ वी जयंती नाशिक महानगरपालिकेच्या वतीने बुधवार, दिनांक २८ मे २०२५ रोजी राजीव गांधी भवन, मनपा मुख्यालय येथे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात मनपाचे प्रभारी आयुक्त तथा प्रशासक करिष्मा नायर व अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावरकरांच्या देशभक्ती, क्रांतिकारी विचारसरणी व समाजसुधारणेच्या कार्याचे आदरपूर्वक स्मरण केले. कार्यक्रमात उपआयुक्त प्रशासन लक्ष्मीकांत साताळकर, कर उपआयुक्त अजित निकत, अतिक्रमण उपआयुक्त अश्विनी गायकवाड, शहर अभियंता संजय अग्रवाल, तसेच इतर विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नाशिक हे स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. सावरकरांचे कार्य आणि विचार नाशिककरांना आजही प्रेरणा देतात. युवावर्गात राष्ट्रनिष्ठा व सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन प्रभारी आयुक्त तथा प्रशासक करिष्मा नायर यांनी या अभिवादन कार्यक्रमात केले.

कार्यक्रम प्रसंगी कार्यकारी अभियंता सचिन जाधव ,नरेंद्र शिंदे ,नवनीत भामरे ,संदेश शिंदे, रवींद्र पाटील, गणेश मैड, बाजीराव माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण,  सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, सुनील ठाकूर,योगेश आडभाई, संतोष चंद्रात्रे, संतोष कान्हे, वामन पवार, कृष्णा फडोळ,महेंद्र विभांडिक, संजय पटेल, मनीषा पाटेकर, अश्विनी ठाकरे, जिजा राऊत, शंकरराव पोरजे,साहेबराव भोसले ,रमेश पागे , भरत जेवूघाले,दीपक बंदरे, यश बारगजेआदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाशिक शहराशी विशेष नाते राहिले आहे. नाशिकच्या भूमीतूनच सावरकरांच्या क्रांतिकारी प्रवासाला दिशा मिळाली. त्यामुळे नाशिककरांच्या मनात सावरकरांविषयी अपार आदर आहे.

 त्यांच्या "स्वदेशी", "शौर्य" आणि "सामाजिक सुधारणां"च्या भूमिकांचा वारसा पुढे नेण्यासाठी महापालिकेच्या आजच्या  सावरकर जयंती अभिवादन कार्यक्रमामुळे उजाळा मिळाला आहे.