ग्रामपंचायत खडक सुकेणेचे श्री मनोहरजी गांगुर्डे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय सन्मान
नाशिक : नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत खडक सुकेणे येथील श्री मनोहरजी गांगुर्डे यांनी ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कामगिरी करून जिल्ह्यात विशेष ठसा उमटवला आहे.
ग्रामपातळीवर डिजिटल ग्राम वेबसाईट, सरपंच फंड यांसारखे तांत्रिक आणि लोकाभिमुख उपक्रम राबवून त्यांनी ग्रामीण प्रशासन अधिक पारदर्शक, सुलभ व आधुनिक करण्याचे मोलाचे कार्य केले. या उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल माध्यमातून गतिमान होण्यास मोठी मदत झाली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद यांच्या हस्ते त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
या गौरवाबद्दल ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री गांगुर्डे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


digitalnashik_admin




