"हर घर तिरंगा" मोहिमेत शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळाचा तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

नाशिक, 13 ऑगस्ट 2025 – "हर घर तिरंगा" मोहिमेच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देत शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ तर्फे तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम हुतात्मा स्मारक, सीबीएस येथे सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत एक हजार नागरिकांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमासाठी शासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजपूत साहेब यांच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत कांबळे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी, गणेशोत्सव महामंडळ नाशिकचे अध्यक्ष समीर शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) शहराध्यक्ष गजानन नाना शेलार, वाल्मिकी समाज अध्यक्ष सुरेश दलोड, हेमंत जगताप,ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश कडलग, दिनेश कमोद तसेच हिंदू एकता आंदोलन पक्ष जिल्हाध्यक्ष किशोर बागमार, शहर अध्यक्ष किरणसिंग पवार, राजाभाऊ नेरकर, नितीन खैरनार यासह मंडळाचे गणेशोत्सव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सर, अध्यक्ष प्रियंका अहिरराव, प्रसाद बावरी, अतुल रणशिंगे, स्वप्निल काथवटे, आदित्य भालेराव सह आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारक येथे क्रांतिकारक आणि शहीद वीर जवानांना अभिवादन करून झाली. त्यानंतर तिरंगा वाटप सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार करणसिंग बावरी यांनी केले.
या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि गौरव वाढवण्याचा संदेश देण्यात आला.