लाखलगाव येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने जन सुरक्षा कॅम्प संपन्न

लाखलगाव | १९ जुलै २०२५ :
मौजे लाखलगाव येथे आज दिनांक १९ जुलै २०२५ रोजी जिल्हा अग्रणीय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जन सुरक्षा कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पच्या माध्यमातून गावकऱ्यांना केंद्र सरकारच्या महत्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमामध्ये विशेषतः प्रधानमंत्री जनधन खाते, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, अटल पेन्शन योजना व इतर महत्वाच्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक श्री. रजत वर्मा, सहाय्यक व्यवस्थापक श्री. योगेश म्हसे आणि आर्थिक साक्षरता सल्लागार सौ. अनुराधा लोढे मॅडम यांनी मार्गदर्शन करत ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांचे फायदे समजावून सांगितले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत लाखलगावच्या सरपंच सौ. चंद्रभागा निवृत्ती कांडेकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे बँक मित्र सौ. ममता सोमनाथ निरगुडे, सोमनाथ भीमराव निरगुडे व ज्ञानेश्वर रामभाऊ राऊत यांनी इच्छुक ग्रामस्थांचे विविध योजनांचे फॉर्म भरून घेतले व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.
कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामीण नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि सामाजिक सुरक्षा योजनांची महती पटवून दिली. ग्रामस्थांनी देखील या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.