' गीत गाता चल ' कार्यक्रमात रसिक झाले दंग.....
नाशिक :- " गुन गुना रहे है भवरे, रहे ना रहे हम, छुपा गये सारे नजारे, हम थे जिनके सहारे, क्या खूब लगती हो, तेरा साथ है कितना प्यारा, ये हसी वादिया, मोहब्बत बडे कामकी चीज है, चंदनसा बदन, मैं शायर तो नही, माय हार्ट इज बिटिंग, तुज संग प्रीत लगायी,'" अशा विविध गाण्यांची अवीट गोडी रसिकांनी अनुभवली. अफलातून म्युझिक लव्हर्से अध्यक्ष व आयोजक श्री. हरिषभाई ठक्कर यांची संकल्पना असलेला ' गीत गाता चल ' भाग- ११ वा हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम स्वर्णिमा हॉल, इंदिरानगर येथे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात गायक कलाकार महेश निकम, संजय परमसागर, समीर कुलकर्णी, सुनील गंधे, संजय गाढे, गायिका अनघा धोडपकर, वर्षाताई कुलकर्णी, मनिषा गवई, मीनाक्षी हिवाळे, लता चांदे, पल्लवी पगारे यांनी एक से बढकर एक गाणी सादर करून उपस्थित रसिक श्रोते यांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळवली. प्रारंभी दिवंगत गायक हेमंत काळे यांच्या दुखद निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
सर्व गायक कलाकारांनी टिमचे कोच सौ प्रीती दीक्षित, संजय निकम व डी. एम. बोरसे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम परफॉर्मन्स सादर केला.

श्री हरिषभाई ठक्कर यांनी नियोजन समितीत अनिलभाऊ पोटे, संतोषभाऊ देहूकर यांना दिलेली कार्यक्रमाची जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडली. कार्यक्रमास श्री गिरीषभाई ठक्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे निवेदन सौ.स्वाती निकम यांनी दिलबहार दिलखुलासपणे केले. ध्वनी व्यवस्था पवन रोकडे यांनी तर व्हिडिओ फोटोग्राफी संजय गाडे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली.


digitalnashik_admin




