नाशिकमध्ये ‘सलमान खान स्पेशल’ कराओके गीतांचा बहारदार संगीत सोहळा
नाशिक :
नाशिक येथील संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणारा ‘सलमान खान स्पेशल’ कराओके गीतांचा भव्यदिव्य कार्यक्रम येत्या रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम परशुराम सायखेडकर, नाशिक येथे होणार आहे.
या संगीत कार्यक्रमात बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यांच्या ‘मैने प्यार किया’ पासून ते ‘सिकंदर’ चित्रपटांतील गाजलेल्या व धमाकेदार गीतांचे सादरीकरण करण्यात येणार असून रसिक प्रेक्षकांसाठी कराओके गीतांची खास मेजवानी असणार आहे.
या कार्यक्रमात नाशिकमधील नामवंत कराओके ग्रुप्स सहभागी होणार आहेत. यामध्ये साज कराओके (गंगापूर रोड) – श्री. श्याम जाधव, एस.डी. कराओके (पंचवटी) – सौ. शैला नेरकर, मनीष कराओके क्लब (नाशिक रोड) – श्री. मनीष अहिरे तसेच आत्मजा डायनॅमिक सिंगर ग्रुप – सौ. नूतन मिस्त्री यांचा समावेश आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रेक्षकांमधून ५ भाग्यवंत प्रेक्षकांची लकी ड्रॉद्वारे निवड करून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी पार्किंगची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिकमधील सर्व संगीतप्रेमी नागरिकांनी या भव्य संगीत सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


digitalnashik_admin




