श्री सप्तशृंगी महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न

श्री सप्तशृंगी महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न

 डांगसौंदाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे श्री.सप्तशृंगी महाविद्यालयात डांगसौंदाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31/01/2026 रोजी निर्भय कन्या अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. पी. एम.जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अश्विनी वणीस व प्रा. सुवर्णा जोंधळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व  डांगसौंदाणे गावच्या उपसरपंच सौ सिंधुताई संजय सोनवणे या होत्या.डॉक्टर  आश्विनी वनीस यांनी विद्यार्थिनींना त्यांचे आरोग्य व भविष्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन केले तर प्राध्यापिका जोंधळे यांनी आलेल्या प्रसंगांवर प्रभावीपणे मात करून यशस्वी होण्याचा मंत्र दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.व्ही. हिरे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रिना बाविस्कर यांनी केले. प्राध्यापिका प्रियंका खैरणार, प्राध्यापिका अश्विनी जगताप, प्राध्यापक एल. ए. जाधव,प्राध्यापक देवरे व  शिक्षक इतर कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.