बिटको महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त ग्रंथालय साक्षरता कार्यक्रम....

नाशिकरोड :- " ग्रंथालय महर्षी डॉ. एस. आर. रंगनाथन म्हणजे ग्रंथालय क्षेत्रास नवीन ओळख करून देणारे एक विलक्षण व्यक्तिमत्व असून त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. ग्रंथालयाच्या विकासाचा पाया रचण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयात एक लाखाच्या वर पुस्तके असून आपले जीवन समृद्ध करायचे असेल तर वाचनसंस्कृती वृद्धिंगत करून जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात व्यतीत करा, " असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रन्थपल एस. व्ही. चंद्रात्रे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस. आर रंगनाथन यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दि. १२ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रंथालय साक्षरता कार्यक्रमात उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते .याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सतीश चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सौ.आर. एस. पाटील, योगेश महाजन, योगेश काळे, भूषण कोतकर, सुजाता गायकवाड, शुभांगी पाटील, संजय परमसागर व विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात सौ. आर. एस. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे वाचन करून आपल्या भावी वाटचालीत फायदा करा. डिजिटल लायब्ररी बाबत माहिती देऊन एका क्लिकवर कुठले पुस्तक उपलब्ध आहे ते समजते. वाचाल तरच वाचाल , आपला जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात व्यतीत करा असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. सतीश चव्हाण यांनीही मनोगत करतांना कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य, कला शाखा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातील उपलब्ध सोयीसुविधा व सेवांबाबत ग्रंथालय साक्षरता प्रबोधनाचा लाभ घ्या असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघा गोतराज, ऋतुजा कोकाटे, एस. के. शेंद्रे, संग्राम जाधव, अनिल गोरे , दर्शन रोकडे यांनी प्रयत्न केले.