बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२

बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२

बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२.कार्तिक शुक्ल प्रतिपदा. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

"आज आनंदी दिवस आहे बली प्रतिपदा, दिवाळी पाडवा, अभ्यंगस्नान, वही पूजन, भाऊबीज पतीस ओवाळणे, गोवर्धन पूजन, ग्रहण करिदिन, यम द्वितीया.

चंद्र नक्षत्र - स्वाती

मेष:- पती/पत्नीशी मतभेद संभवतात. किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतात. कर्मचार्यांशी जुळवून घ्या. 

वृषभ:- व्यवसायात वाढ होईल. मात्र अधिक मेहनत करावी लागेल. संध्याकाळ आनंदाची. 

मिथुन:- योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्या. अन्यथा अडचणीत वाढ होईल. तब्येत सांभाळा.   

कर्क:- माता आणि भार्या यांच्यात समझोता करावा लागेल. घरात शांतता पाळावी लागेल.   

सिंह:- व्यवसाय वृद्धी होईल. नवीन आव्हाने मिळतील. त्यातून यशस्वी वाटचाल कराल.  

कन्या:- कुटुंबास वेळ द्यावा लागेल. छोटी सहल घडेल. शब्दास मान मिळेल. 

तुळ:- आत्मविश्वास वाढेल. घरात काही मोठे बदल कराल. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील. 

वृश्चिक:-  नवीन मार्ग सापडेल. प्रगतीचा वेग वाढेल. मात्र संयम ठेवावा लागेल. आप्त भेटतील.

धनु:- कामात अडथळे येऊ शकतात. काहीशी वाट बघावी लागेल. नियोजन बिघडेल. 

मकर:-  नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सहकारी मदत करणार नाहीत. वादाचे प्रसंग टाळा.  

कुंभ:- आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे लागेल. जेष्ठ आप्तांची चिंता लागेल. परदेश प्रवासात अडचणी येतील.  

मीन:- दीर्घकालीन फायद्याचे नियोजन होईल. मात्र संयम बाळगावा लागेल. आरोग्यकडे दुर्लक्ष नको.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)