' मेहेकी यादे ' तुमसे ही ' संगीत मैफिलीत श्रोते दंग.....
नाशिकरोड : एस व्ही कराओके सिंगिंग क्लब वतीने आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ' मेहेकी यादे - प्यारकी बाते ' तुमसे ही ' या अवीट गोडी बहारदार संगीत मैफिलीत नाशिकरोडकर रसिक श्रोते दंग झाले. रविवारी ( दि. १७ मे ) सायंकाळी ६ वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे रंगलेल्या या मैफिलीत हिंदी व मराठी गाण्यांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगत गेलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी टाळयांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. मैफिलीची सुरुवात गणेश स्तवनाने होऊन विनोद बर्वे यांनी ' विठू माऊली तू ' या भक्ती गीताने प्रारंभ होत होठो से छू लो तुम, जहा मै जाते हु वही चले आते हो, बार बार देखो, खेळ कुणाला दैवाचा कळला, ओ दिलबर जानीये, तेरे इश्क का मुझपे हुआ ये असर, मेरे दिलने तडप के जब नाम तेरा पुकारा, अपने प्यार के सपने, तुमसे मिलने की तमन्ना है, इस प्यार से मेरी तरफ ना देखो, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, तुमसे ओ हसीना कभी, टायटल गीत तुमसे ही आणि कव्वाली- चढता सूरज धीरे धीरे, आसमान से आया फरिश्ता या अशा हिंदी, मराठी गीतांनी वातावरण भारावून टाकले.





मैफिलीत गायक संजय परमसागर यासह गॉडविन लुईस, वनिता आहेर, स्वप्ना गोखले, श्याम शहाणे, किशोर भारती, स्मिता पोटे, प्रज्ञा गोपाळे, नितीन केदारे, संजय साळवे, जितेंद्र दिवे , शांताराम घुगे, अनिल पांचाळ, सुदेश आमेसर, प्रितम आमेसर, रश्मी सोनी, रोहीत कुलकर्णी, शैलजा व सुरेंद्रनाथ सोनार यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यात नाशिकरोड प्रभाग सभापती आर डी धोंगडे, अफलातून ग्रुपचे अनिल पोटे,मनोज दीक्षित, राजेश पाटील,अक्षय फाउंडेशनच्या मोनादीदी, एमपी स्टार ग्रुपचे मोहनभाऊ पवार, डॉ. माधुरी जाधव यासह रसिक उपस्थित होते. तंत्र सहाय्य एव्हीएस टेकनॉलॉजिजचे संचालक श्री. विनोद बर्वे तर ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन रोहिणी सोनार यांनी काव्यशैलीत खुमासदारपणे करत उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले.

digitalnashik_admin




