अफलातून म्युझिक लवर्स यांच्या सौजन्याने स्व. आमदार जयप्रकाशजी (दादा) छाजेड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन
अफलातून म्युझिक लवर्स यांच्या सौजन्याने स्व. आमदार जयप्रकाशजी (दादा) छाजेड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री प्रितीश (दादा) छाजेड यांच्या प्रस्तुतितून सादर होणारा हा कार्यक्रम “मूड्स ऑफ आशा” या संकल्पनेवर आधारित असून, तो गुरुवार, दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता महाकवी कालिदास कला मंदिर, शालिमार, नाशिक येथे संपन्न होणार आहे.
या संगीतमय कार्यक्रमाला अफलातून ग्रुपचे अध्यक्ष श्री हरीशभाई ठक्कर व श्री बाळूशेठ भुतडा यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमात नाशिकमधील नामवंत गायक सहभागी होणार असून, आशाताई भोसले यांच्या अजरामर गीतांची अप्रतिम संगीतमय मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाचे निवेदन होम मिनिस्टर फेम गायक श्री संतोषभाऊ फासाटे करणार असून, कार्यक्रमाचे नियोजन श्री गिरीशभाई ठक्कर व श्री अनिलभाऊ पोटे यांनी केले आहे. तसेच झी टीव्ही – उत्सव नात्यांचा फेम असलेले अमोल पाळेकर यांचे वाद्यवृंद या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरणार आहे.
स्व. आमदार जयप्रकाशजी (दादा) छाजेड यांच्या स्मृतीस अभिवादन करणारा हा कार्यक्रम संगीतप्रेमींकरिता अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


digitalnashik_admin




