‘माझे जीवनगाणे – भाग ५०’ गोल्डन ज्युबिली कार्यक्रम रविवारी
नाशिक : प्रमोद कापडणे प्रस्तुत धून कराओके आयोजित “माझे जीवनगाणे – भाग ५० वा” या गोल्डन ज्युबिली विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. १ मार्च रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम इंदिरानगर, नाशिक येथील स्वर्णिमा सभागृह येथे दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.
या विशेष पर्वात तब्बल ७५ गायक सहभागी होणार असून एकूण ५० डुएट मराठी व हिंदी गाणी सादर करण्यात येणार आहेत. संगीतप्रेमींसाठी ही एक अनोखी मेजवानी ठरणार आहे.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहून या गोल्डन ज्युबिली सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

digitalnashik_admin




