वन विभाग, सिन्नर येथे "विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या भेटीला" या उपक्रमाचा यशस्वी समारोप
सिन्नर : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक भेटीचा समारोप वन विभाग, सिन्नर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गेल्या सहा दिवसांपासून हे विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत याची सुरुवात तहसील कार्यालय सिन्नर, पंचायत समिती सिन्नर, सिन्नर पोलीस स्टेशन, नगरपालिका सिन्नर, कृषी विभाग सिन्नर, व आज वनविभाग सिन्नर येथे अखेर समारोप झाला.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी कशी असावी याचे प्रत्यक्ष धडे घेतले व भविष्यात वेगवेगळ्या पदांवर जाऊन कसं समाजउपयोगी कार्य करता येईल असा निर्धार आज केला आहे
या आजच्या भेटी प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर सर, उपस्थित सहाय्यक वनपरिक्षेत्र आधिकारी व नाशिक पूर्व चे वन्यजीव संरक्षक प्रशांत हाडपे सर व विभागातील सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी वनसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, वन्यजीव सुरक्षा तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शासकीय योजनांची अंमलबजावणी व वन विभागाचे दैनंदिन कामकाज याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनातील कार्यपद्धतीची सखोल समज करून घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे व्यवहार्य ज्ञान मिळाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट विशेष उपयुक्त ठरली.
या उपक्रमाची संकल्पना, राज्यशास्र विभाग प्रमुख स.प्रा.संतोष आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या आज समारोप झाला यावेळी राज्यशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी संजीवनी यादव,प्राजक्ता दराडे, सुमन राजभहर ,ईश्वर सांगळे, कांचन आव्हाड सिद्धेश्व आव्हाड, ओमकार कणसे, अजिंक्य बोडके, शुभम गांजवे, ओमकार रोडे, इत्यादी विद्यार्थी व स. प्रा. संतोष आव्हाड, हे यावेळी उपस्थित होते.

digitalnashik_admin




