सिन्नर नगर पालिका येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट
सिन्नर : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी नगर पालिका, सिन्नर येथे शैक्षणिक भेट देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.
या प्रसंगी मुख्याधिकारी-अभिजीत कदम,उप-मुख्याधिकारी दिपक बंगाळ, शहर अभियान प्रमुख- अनिल जाधव, लेखापाल- सचिन पगार, संगणक अभियंता- अभितोष सांगळे, नगर रचना विभाग- अमोल पवार, कर विभाग- योगेश मुळे बांधकाम विभाग- सौरभ गायकवाड पाणीपुरवठा विभाग- प्रशांत मेश्राम,आरोग्य निरीक्षक - रवींद्र देशमुख तसेच संबंधित सर्व विभाग प्रमुखांनी नगरपालिकेचे कार्य, नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, विविध विकासकामे आणि प्रशासनाची कार्यपद्धती याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून प्रत्यक्ष कार्यप्रणाली समजून घेतली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य व्यवस्थेची व्यवहार्य माहिती मिळाली असून नागरी प्रशासनाविषयी जागरूकता वाढीस लागली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट विशेष उपयुक्त ठरली.
या उपक्रमाची संकल्पना, राज्यशास्र विभाग प्रमुख स.प्रा.संतोष आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडत आहे या भेटीदरम्यान राज्यशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी, निकिता सोनवणे.संजीवनी यादव,कांचन कुशारे,प्राजक्ता दराडे,ज्ञानेश्वरी गाडेकर,सुमन राजभहर,प्रियंका बर्डे,ईश्वर सांगळे, कांचन आव्हाड सिद्धेश्व आव्हाड, अश्विन जाधव, दिव्या गीते इत्यादी विद्यार्थी व स. प्रा. संतोष आव्हाड, हे यावेळी उपस्थित होते.


digitalnashik_admin




