भारतीय शिक्षण संशोधन आणि ज्ञानाचे आदान-प्रदान या विषयावरील राष्ट्रीय परिषद बिटको महाविद्यालयात संपन्न

भारतीय शिक्षण संशोधन आणि ज्ञानाचे आदान-प्रदान या विषयावरील राष्ट्रीय परिषद बिटको महाविद्यालयात संपन्न

नाशिकरोड : भविष्यातील शिक्षण क्षेत्रातील बदलाचे वारे त्याचे सिंहालोकन या परिषदेतून उहापोह विविध तांत्रिक क्षेत्रात होत असते. शिक्षण क्षेत्र माणूस घडवणारी संस्था असून  उद्याच्या विद्यार्थ्यांचे समाजातील स्थान कसे यासाठी नावीन्यता व संशोधन बेस शिक्षण हवे . शिक्षण समाजाभिमुख असावे. २०३० मध्ये आजचे शिक्षण उपयोगी कसा होईल किंवा वैश्विक कसे उपयोगी होईल याचे मन्थन व्हावे. मनुष्य भावनाप्रधान असेल असून उद्या रोबोटीक दुनियेत काम करून घेणे हे मोठे आव्हान जगासमोर असेल, " असे मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले.

            महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन परिषद (पुणे ), गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक आणि एमएसजी फाउंडेशन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित '  भारतीय शिक्षण संशोधन आणि ज्ञानाचे आदान-प्रदान या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुसुमाग्रज अध्यासन विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटीचे  प्रेसिडेंट  डॉ. आर. पी. देशपांडे, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ. सुहासिनी संत, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, एमसीईएएमचे सचिव डॉ. के. आर. शिंपी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  मंजुषा कुलकर्णी,  उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. महेश औटी, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.

            प्रारंभी नेहा आहेर, नंदिनी यादव, वैभवी चौधरी यांनी स्वागत गीत सादर केले. प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करून मान्यवरांचा  परिचय करून दिला. यावेळी सौ. रोहिणी बटवाल, डॉ. कीर्ती कुलकर्णी या दोन प्रतिनिधीनी दोन दिवसीय परिषदेविषयी प्रतिनिधीक मनोगते व्यक्त केले. या कार्यक्रमात देणगीदार, माजी प्राचार्य, माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी  डॉ. उत्तम करमाळकर, डॉ. किशोरी धुमाळ, डॉ. कांचन निकम, सहा. प्रा. प्रतिभा घुगे, सचिन बागुल, सोनल अस्थाना यांनी सर्व विविध सत्रांचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला.

         प्रारंभी सकाळच्या सत्रात दोन तांत्रिक सत्र संपन्न झाली. यात संशोधन पद्धतीद्वारे सबलीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणावरील परिणाम या दोन विषयांवर नामवंत शास्त्रज्ञ व कन्सलटिंग इंजिनिअर डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी व  एसएमआरके  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात परिषदेच्या डायरेक्टर प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.  उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर,डॉ.महेश औटी व प्रा. डॉ.  मीनाक्षी राठी यांनी समन्वयक म्हणून काम  पाहिले.  तसेच सर डॉ. मो. स. गोसावी  गौरव व्याख्याना प्रसंगी आर. एच. सपट इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एस. साने यांनी ' भारतीय शैक्षणिक प्रणालीतील सुधारणा '  या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी केंद्रीय समन्वय समितीच्या अध्यक्षा डॉ. अंजली कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी डॉ. सरिता औरंगाबादकर  आणि डॉ. लीना भट यांनी पेपर सादर केले. डॉ. राम कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना नाशिकरोड महाविद्यालयास ६० वर्षे पुर्ण होऊन सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी घडवले. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात करिअर करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करीत आहेत असे सांगितले. 

          विशेष अतिथी डॉ. दिलीप धोंडगे यांनी मार्गदर्शन करताना नवीन अभ्यासक्रम  विद्यार्थीहित  व काळानुरूप  तसेच नावीन्यपुर्ण हवीत. त्यासाठी योग्य व्यवस्थापन हवे. विद्यार्थ्यांमधील बलस्थाने शोधा. उद्याच्या परिस्थितीवर मात करण्यास सक्षम, कटीबद्ध होण्याची गरज असल्याचे  सांगितले.

         अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. सुहासिनी संत यांनी नाशिकरोड महाविद्यालयाला एक समृद्ध परंपरा असून येथील विद्यार्थी विविध पातळीवर नाव एका उंचीवर नेऊन ठेवले आहे . या परिषदेत जे  विविध विचार घेऊन त्यातील अध्यापन कार्याचे नवीन गोष्टी विद्यार्थ्यांना कसे उपयोगी होईल याची संपूर्ण मार्गदर्शन विविध वक्त्यांनी दिल्याचे सांगितले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यायोंती  तलवार आणि डॉ. उत्तम करमाळकर  यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे यांनी मानले. या कार्यक्रमात विविध समित्यांमध्ये कार्यरत प्राध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.