नाशिक महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे

नाशिक महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता नाशिक महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे आणि जन सामान्यांचे प्रश्न सोडविण्याकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन शिवसेना उपनेते विजय (अप्पा) करंजकर आणि शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी नाशिक शहर कार्यकारिणीच्या बैठकीत केले. 

नाशिक महानगरातील शिवसेना आणि अंगीकृत संघटनांची बैठक शनिवारी मायको सर्कल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत शिवसेना उपनेते विजय करंजकर आणि महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी उपस्थित शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन करण्यात आले. शिवसेना नेते ना. दादासाहेब भुसे यांची शिक्षण मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. आगामी नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या  मंत्रानुसार समाजात काम करण्याचे आवाहन उपनेते विजय (अप्पा) करंजकर यांनी केले. प्रत्येक प्रभागात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात यावी. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी अग्रेसर राहण्याच्या सूचना हानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी देऊन लवकरच शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. महायुतीत लढायचे की स्वतंत्र लढायचे ? याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार असून प्रत्येक प्रभागात अधिक सक्रिय होण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. केवळ उमेदवारीसाठी नव्हे तर पक्ष बांधणीसाठी काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने सारख्या विविध जनोपयोगी योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना, विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 

या बैठकीला माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे,  आर. डी. धोंगडे,  शामकुमार साबळे, चंद्रकांत खडे, भागवत आरोटे, हर्षदा गायकर, सचिन भोसले, योगेश म्हस्के, हर्षल शिंदे, मंदाकिनी दातीर, मंदाकिनी जाधव, जयश्री खर्जूळ , वैशाली दाणी, ज्योती खोले, शामलताताई दीक्षित, सुलोचना मोहिते, पुजा तेलांग, ज्योती फड, भिवानंद काळे, सनी रोकडे, अरुण घुगे, दिपक मौले, कैलास जाधव, बबलु सूर्यवंशी, आकाश पवार, योगेश गांगुरडे, प्रकाश पवार, शिवा तकाटे, नितिन चिडे, संदीप लभडे, शरद नामपूरकर, प्रकाश दोंदे, राजेंद्र मोहिते, मनीष खेले, सागर बोरसे, इशाक शेख, नितीन अमृतकर, हर्षल दाणी, अमित मांडवे, आदींसह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थी सेना, वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.